'त्या' रस्त्यासाठी आमदार जगतापांचा पुढाकार; शरद पवारांची घेतली भेट


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहरातून जाणार्या कल्याण - विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत प्रस्तावित कल्याण रोडवरील बायपास चौक ते नेप्ती चौक ते सक्कर चौक या रस्त्याचा 28.86 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे याकडे लक्ष वेधून, केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी शिफारस करण्याची मागणी, आमदार जगताप यांनी पवारांकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येत असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. कल्याण रोड परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झालेले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसह कायमस्वरुपी उपाययोजनांची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी दोन दिवसांपुर्वीच समक्ष पाहणी केली व अधिकार्यांशी चर्चा केली. या रस्त्यासंदर्भात 2018 मध्येच केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आलला असून, अद्याप प्रलंबीत आहे. त्यामूळे आमदार जगताप यांनी तत्काळ खासदार शरद पवार यांची भेट घेतली. सदर रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव मंजुरी व निधीसाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम, रस्ते वाहतुक मंत्रालयाकडे शिफारस करावी, अशी विनंती त्यांनी खासदार पवार यांच्याकडे केली आहे.

कल्याण रोडवर नेप्ती चौक ते बायपास चौक रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यावर कायमस्वरुपी मार्ग काढणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडे या कामाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांची भेट घेऊन, या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याकरिता शिफारस करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास कायमस्वरुपी तोडगा निघून कल्याण रोड परिसरासह नालेगाव, नवीन टिळक रोडवरील रस्त्याचे चौपदरीकरण होईल. विविध समस्या मार्गी लागुन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post