खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण द्या, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : कोरोनाचा सामना करताना सरकारी वैद्यकीय सेवेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने खासगी डॉक्टर्सना रुग्णसेवा करण्याचे आदेश दिले. पण त्यांना विमा कवच दिले नाही कोरोना रुग्णावर उपचार करणारे खासगी डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील बहुसंख्य खासगी सेवेतील डॉक्टर्सनी आणि इतर खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व्यवसायाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णांची सेवा सुरू ठेवली. पण त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळत नाही. वास्तविक खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे असे या पत्रात राज ठाकरे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारने या विषयात तातडीने लक्ष घालावे व त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post