एनसीसीच्या 'सी' सर्टिफिकेटचा तिढा; खासदार विखेंच्या पाठपुराव्यामुळे छात्रसैनिकांना दिलासा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोना साथीने थैमान घालण्यापूर्वी बीड जिल्ह्यात सैन्यभरती शिबिर आयोजित केले गेले होते. या सैन्यभरतीसाठी नॅशनल कॅडेट कॉर्पचे 'सी' प्रमाणपत्र ज्या छात्र सैनिकांकडे असेल, त्या छात्र सैनिकांना लेखी परीक्षेतून सूट देण्यात येते. मात्र, कोविड साथीमुळे अनेक छात्र सैनिकांना वेळेत प्रमाणपत्र देता आले नाही. अनेक युवकांना सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याची संधी हुकली. 

खासदार सुजय विखे पाटील यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेतली. कोरोनामुळे अनेक पात्र युवकांना प्रमाण पत्र मिळू शकले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांना सर्टिफिकेट सादर करण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली.

जनरल नरवणे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून छात्र सैनिकांना संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतचा आदेश संबंधित विभागाला दिला असल्याची माहिती खासदार  विखे पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे अहमदनगर नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक छात्र सैनिकांचा सैन्य भरतीचे त्यांचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग सुकर होईल.

Post a Comment

Previous Post Next Post