माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचा कोपरगावात आमदार काळे यांच्या हस्ते शुभारंभ

 

एएमसी मिरर वेब टीम
कोपरगाव :
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान सुरू केले असून या अभियानाअंतर्गत नगरपरिषद व ग्रामपंचायतमार्फत मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी करण्यासाठी येणाऱ्या आरोग्यसेवकांना नागरिकांनी सहकार्य करावे व योग्य माहिती द्यावी, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाची कोपरगाव शहरात आज सुरुवात झाली. यावेळी कोपरगाव मतदारसंघातील आशा सेविकांना आमदार काळे यांच्याकडून फेस शिल्ड मास्क देण्यात आले.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. कांडेकर मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, प्रतिभाताई शिलेदार, अजीज शेख, डॉ. अजय गर्जे, डॉ. तुषार गलांडे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. वैशाली आव्हाड, रमेश गवळी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, नवाज कुरेशी, संतोष चवंडके, संदीप कपिले, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, दिनेश खरे, रावसाहेब साठे, मनोज कडू, नारायण लांडगे, ए.जी. लोंगाणी, मनमोहन लोंगाणी, पप्पूशेठ लोंगाणी, रवींद्र देवरे, राजेंद्र फुलफगार, शुभम लासुरे, आशा सेविका, आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post