मोदींचा वाढदिवस साजरा करताना झाला स्फोट; पहा व्हिडीओ -

 

एएमसी मिरर वेब टीम
चेन्नई :
देशभरात १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान चेन्नईमध्येही एका कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. परंतु या कार्यक्रमादरम्यान मोठी घटना घडली. हेलियमचे फुगे फुटल्यामुळे भाजपाचे ३० पेक्षा अधिक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

तामिळनाडूनतील चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान हेलियमच्या फुग्यांच्या स्फोट होऊन ३० कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणत्याही कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली नाही. अंबात्तूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमात हेलियम गॅसचे दोन हजार फुगे आकाशात सोडण्यात येणार होते.


१७ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त जनतेकडून तसंच राजकीय क्षेत्रातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा सप्ताह’ आयोजन केलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post