पार्थ पवारांनी पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा

 


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असून, त्यांच्यावर सोशल माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही पंतप्रधान मोदी यांचं ट्विट करून अभिष्टचिंतन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्तानं मोदी यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनीही मोदींना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधानांना राष्ट्राची सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि शक्ती मिळो,” असं म्हणत पार्थ पवार यांनी मोदींचं अभिष्टचिंतन केलं आहे.

पार्थ पवार यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा आहे,” अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पंतप्रधान मोदींच्या ध्येय धोरणांवर टीका करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post