विद्यापीठाच्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

 

एएमसी मिरर वेब टीम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने 1 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत घेऊन, निकाल 10 नोव्हेंबरपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे, असे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, मौखिक किंवा प्रकल्पाच्या परीक्षा 30 सप्टेंबरपूर्वी घेण्यात येण्याच्या सूचना परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत.


परीक्षा मूल्यमापन व मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी याबाबत परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. यामध्ये परीक्षा पद्धतीबाबत इतर सूचना यापूर्वीच्या परिपत्रकाप्रमाणे ठेवण्यात आल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी नियमित, पुनःपरीक्षार्थी , बॅकलॉग विषयांच्या परीक्षा 13 मार्च 2020 पर्यत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर घेण्यात याव्यात. तसेच अंतिम पूर्व वर्षाच्या पुनःपरीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर घेण्याच्या सूचना डॉ. काकडे यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येईल. ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने होणार्‍या एमसीक्यू बेस्ड परीक्षांसाठी छायांकित प्रत व पुनर्मुल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असेही डॉ. काकडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post