क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मीरा रोडमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना जूनमधली असून महिलेने आता तक्रार दिल्याने ही घटना समोर आली आहे.

मीरा रोडमध्ये एक 20 वर्षीय महिला तिच्या नातेवाईकासोबत क्वारंटाईन सेंटर मध्ये राहत होती. 11 वर्षाच्या तिच्या एका नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची देखभाल करण्यासाठी ही महिला क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत होती. तिला 10 महिन्याचे मूलही होती. एक तरुण गरम पाणी देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधली. एका रात्री गरम पाणी देण्याच्या नावाने तो महिलेच्या वॉर्डमध्ये घुसला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करु लागला. महिलेने विरोध करताच त्याने तिच्या बाळाला जिवे मारण्याची धमकी दिली. या आरोपीने महिलेवर तीन वेळा बलात्कार केला. तसेच बाहेर कुठे वाच्यता केल्यास बाळाला आणि तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली. तेव्हा महिला याप्रकरणी गप्प बसली. अखेर शनिवारी हिम्मत दाखवत पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post