राहात्याचे ग्रामदैवत विरभद्र मंदिरात चोरी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राहाता येथील ग्रामदैवत असलेल्या विरभद्र मंदिरात चोरी झाली असून देवाच्या डोक्यावरील चांदीच्या‌ तीन मुकूटांसह सहा किलो चांदीच्या दागिन्यांची दोन चोरट्यांनी चोरी केली. समोरच्या भिंतीवरून आत प्रवेश करत मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत मूर्ती डोक्यावरील मुकूट तसेच पादुका व प्रभावळ चोरून नेली असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

तीन लाख 37 हजार रुपये‌ किंमतीच्या आभूषणांची चोरी झाल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष सागर सदाफळ यांनी दिली. दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून मंदिराच्या मागील बाजून ते निघून गेले. पहाटे 3 वाजेच्या सुमारास‌ चोरी झाली चोरीची माहिती कळताच अतिरिक्त पोलीस अधिकारी दिपाली काळे, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाकडून चोरट्यांचा‌‌‌ माग काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post