ताजमहाल आजपासून पर्यटकांसाठी खुला

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ताजमहाल 21 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाने ताज बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली तयार केली आहे. पर्यटकांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार असून दिवसभरात फक्त पाच हजार पर्यटकांनाच ताज पाहण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील पर्यटनस्थळे मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. ताजमहालचे दरवाजे 17 मार्च रोजी पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. पुरातत्व खात्याने ताजमहाल 21 सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येत असल्याचे जाहीर केले. पर्यटकांना कोरोनाच्या नियमांचे कसोशीने पालन करावे लागणार आहे. ताजबरोबरच आर्ग्याचा किल्लाही पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असून दररोज फक्त अडीच हजार पर्यटकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन तिकीट बुक करावे लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post