'अंडासेल' म्हणजे नक्की काय? गुन्हेगार अंडासेलला का घाबरतात?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारतात कैद्यांना शिक्षा सुनावल्यावर त्यांच्या गुन्ह्यानुसार त्यांना तुरुंगात पाठवले जाते. मात्र या तुरुंगवासात सर्वांत भयानक अंडासेल हा प्रकार समजला जातो. दहशतवादी अजमल कसाब, अभिनेता संजय दत्त, गँगस्टर अबू सालेम आणि इतरही अनेक गुन्हेगारांना अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते.

अंडासेलचे स्वरूप :
अंधार असलेली अंड्याच्या आकारातील एक खोली म्हणजे अंडासेल असे ढोबळमानाने सांगता येईल. अंड्यासारख्या आकारामुळे याला अंडासेल असे म्हणतात.

अंडासेलमध्ये प्रकाश येण्यासाठी अजिबात जागा नसते. येथे कैद्याला 24 तास मिट्ट अंधारात काढावे लागतात. तसेच कैद्याला सर्व विधीदेखील येथेच उरकावे लागतात.

️कैद्याला अंडासेलमध्ये ठेवण्याचा उद्देश हा त्याचे मानसिक खच्चीकरण करून त्याला पुन्हा गुन्हा करण्याची इच्छा न होवो हा असतो.

️अंडासेलमध्ये शक्यतो अत्यंत गंभीर गुन्ह्यातील आरोपी, दहशतवादी, अतिरेकी, कुख्यात गुंड अशा स्वरूपातील गुन्हेगारांना ठेवले जाते.

तुम्हाला माहिती आहे का ?
महाराष्ट्रात मुंबईतील ऑर्थर कारागृहामध्ये तसेच पुण्यातील येरवडा कारागृहातदेखील अंडासेल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post