२ कोटी २ लाख शिवभोजन थाळी वितरीत

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महाविकास आघाडी सरकारने गरिबांसाठी स्वस्तात जेवण देण्यासाठी ‘शिवभोजन थाळी’ ही महत्वपूर्ण योजना आणली. याला करोनाच्या काळात गरीब जनतेला सर्वाधिक फायदा झाला. या काळात २ कोटी २ लाख शिवभोजन थाळी वितरीत झाली, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, “शिवभोजन थाळी ही मूळ योजना १० रुपयांत थाळी अशी होती, ती करोनाच्या काळात आपण ५ रुपयांत थाळी अशी केली. या पाच रुपयांत थाळीचा अनेकांनी लाभ घेतला, करोनाचा काळ सुरु झाल्यापासून आजपर्तंयत २ कोटी २ लाख थाळ्या वितरीत झाल्या आहेत.”

करोना हा पाहुणा जायला काही तयार नाही. या पाहुण्याला दिली ओसरी, पाहुणा हातपाय पसरी अशी परिस्थिती होती. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत आहेत. १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन ते सव्वादोन हजार रुग्ण व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवर आहेत. ७० ते ८० टक्के रुग्ण सौम्य लक्षणाचे आहेत. तुम्ही खबरदारी घ्या, जबाबदारी आम्ही घेतो, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले.

Post a Comment

Previous Post Next Post