सतत उचकी लागण्याची शास्त्रीय कारणे काय आहेत?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

उचकी लागणे ही एक संरक्षित प्रतिक्षित क्रिया आहे. जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की विषकारक पदार्थ तयार झाले किंवा काही असाधारण परिस्थिती निर्माण जाली की जठराबरोबर स्नायुयुक्त पडदाही अचानक आकुंचन पावतो. त्यामुळे हवा फुफ्फुसात जाऊन/जाण्यास अविरोध निर्माण होतो आणि एक विशिष्ट आवाज निर्माण होतो. याला उचकी लागली असे म्हणतात. थोडक्यात काय, डायफ्रॅमच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्‍वासनलिकेतून बाहेर टाकली जाण्याची क्रिया होते. परंतु स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ असल्यामुळे मोठ्याने आवाज होतो.

उचकी निर्मितीची काही महत्वाची कारणे :

१) धुळ व धुरयुक्त वायु श्वासपथात जाणे (बिडी, सिगारेट इत्यादीचा धुर)

२) थंड स्थानात राहणे, अति थंड पाणी पिण्याकरिता वापरणे, थंड पाण्याने स्नान करणे

३) अतिव्यायाम, अतिमैथुन, अत्याधिक चालणे

४) कोरडे स्नेहरहित पदार्थ खाणे, अवेळी किंवा थोडे किंवा अतिप्रमाणात खाणे

५) नेहमी अपचनाने आम्लदोष निर्मिती होत असेल तर

६) शरीराचे उपवास आदी विविध कारणांनी अपतर्पण झाले असेल तर, शरीरात रूक्षता अत्याधिक असेल तर

७) अत्याधिक दुर्बलता असेल तर, मर्मस्थानावर आघात झाला असेल तर

८) इतर आजारांचा उपद्रव किंवा चिकित्सा उपक्रमाच्या अतियोगने दमा व उचकी आदी रोग उत्पन्न होतात.

९) तसेच सेम, उडद दाळ, तीळाची खल्ली तीळाचे तैलाचे सेवन करने

१०) मैद्यासारखे अतिशय बारीक दळलेल्या पिठाच्या पदार्थांचे सेवन करणे, विदाहकारक, पचावयास अतिशय जड पदार्थांचे नियमित सेवन करणे

११) जलज मांस, आनुप प्रदेशातील मांस, दही आणि कच्च्या दुधाचे अधिक सेवन करणे.

12) कफवर्धक तसेच शरीरातील स्रोतसात अवरोध निर्माण करणारया कारणांनी दमा आणि उचकी सारख्या आजारांची निर्मिती होते.

उचकीचे कारणं भिन्न असू शकतात. पण जर, एखाद्याला उचकीचा खूप दिवसापासून त्रास होत असेल तर त्याचे कारणे खालील प्रमाणे असू शकतात.

१३) मज्जातंतूची विकृती.

१४) गरोदरपणा.

१५) अलीकडेच दिलेल्या भूलीचा परिणाम.

१६) पोट किंवा उदरची शस्त्रक्रिया

१७) पोट, आत, यकृत किंवा डायाफ्राम समस्या.

१८) मद्यपान

१९) कॅन्सर (कर्करोग).

२०) न्युमोनिया किंवा प्ल्युरिसी.

२१) मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या इतर समस्या

२२) मानसिक समस्या जसे तणाव किंवा चिंता.

('कोरा' या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post