भारतानंतर आता पाकिस्तानमध्येही TikTok वर बंदी, काय आहे कारण?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पाकिस्तानने चिनी अॅप टिकटॉकला ब्लॉक केलं आहे. यापूर्वी भारत आणि अमेरिकेसारख्या देशांनी टिकटॉकवर बंदी घातली होती. पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरणाने अनैतिक, अशोभनीय आणि अश्लील सामग्रीची मोठ्या प्रमाणात तक्रार घेतल्यानंतर चीनच्या टिकटॉक अ‍ॅपला इशारा दिला होता.

दूरसंचार प्राधिकरणाने (PTA) म्हटले आहे की समाजातील अनेक घटकांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे पीटीएने व्हिडिओ शेअरींग अ‍ॅप ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे. प्राधिकरणाने निवेदनात म्हटले आहे, की या प्लॅटफॉर्मवरुन शेअर होणारं डाटा 'समाज आणि विशेषत: तरुणांवर खूप नकारात्मक प्रभाव पडू शकतो'.

रिलायन्स जियोची टिकटॉकमध्ये गुंतवणूक?
भारत आणि चीन यांच्यातील सीमावादानंतर सरकारने अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली. त्यामध्ये TikTok या लोकप्रिय अॅपचाही समावेश होता. अशातच टिकटॉकमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी गुंतवणूक करण्याच्या विचार करत आहेत. एका रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, असं सांगण्यात येत आहे की, टिकटॉक आणि जियो यांच्यातील ही बोलणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून रिलायन्स ग्रुप सध्या गुंतवणूकीच्या शक्यतांवर विचार करत आहे.

भारतात टिकटॉक बॅन केल्यानंतर ByteDance च्या मालकीची कंपनी असलेल्या टिकटॉकला मोठ्या प्रमाणावर नुकसानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सध्या गुंतवणूकीबाबत रिलायन्स आणि बाईटडान्स यांच्याकडून कोणत्याही प्रकराची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारतात टिकटॉकवर बंदी
गलवाल खोऱ्यात चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेनंतर भारतात 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताने या निर्णयासाठी सार्वभौमत्व, सुरक्षा आणि गोपनीयता ही कारणं देत चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. दरम्यान, टिकटॉक चिनी सरकारसोबत युजर्सचा डाटा शेअर करत असल्याचा आरोप भारता व्यतिरिक्त इतरही अनेक देशांनी लावला आहे.

टिकटॉक व्यतिरिक्त यूसी ब्राउझर, शेअर इट, हॅलो, लाइक, कॅम स्कॅनर, शीन यांसारखे अॅप्सही भारत सरकारने बॅन केले होते. बायडू मॅप, केवाई, डीयू बॅटरी स्कॅनर हे अॅपही बॅन झाले आहेत. दरम्यान, सरकारने या चिनी अॅप्सवर आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत बंदी घातली होती.

Post a Comment

Previous Post Next Post