अहमदनगर : आज ३६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२९० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६३ आणि अँटीजेन चाचणीत २२१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, जामखेड ०४, कर्जत ०३, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०८, पारनेर ०२, श्रीगोंदा २१, मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ६३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३०, अकोले ०१, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पाथर्डी ०२, राहाता ०५, राहुरी ०२, संगमनेर ०१, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०५, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २२१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २७, अकोले १०, जामखेड १९, कर्जत १९, कोपरगाव १३,नगर ग्रामीण ०२, नेवासा १७, पारनेर १४, पाथर्डी २१, राहाता १३, राहुरी ०२, संगमनेर २८, शेवगाव १३, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, अकोले ३१, जामखेड ३६, कर्जत २४, कोपरगाव १५, नगर ग्रा. २७, नेवासा १२, पारनेर २२, पाथर्डी ४५, राहाता ५४, राहुरी ०९, संगमनेर ३३, शेवगाव २५, श्रीगोंदा ३२, श्रीरामपूर १४, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल १७ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या : ४७२९६
  • उपचार सुरू असलेले रूग्ण : ३२९०
  • मृत्यू : ७८९
  • एकूण रूग्ण संख्या : ५१३७५
(स्त्रोत : नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post