एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज घेतलेल्या महिला बचत गटांना कर्जमाफी मिळण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेने केली आहे. यासाठी आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून येत्या सोमवारी (२ नोव्हेंबर) बचत गटांतील महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला जाणार आहे.
महिला बचत गटाचे मायक्रो फायनान्ससह इतर सर्व कंपन्यांचे कर्ज माफ होण्यासाठी सोमवारी (२ नोव्हेंबर) नगर जिल्ह्यातील महिलांचा मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष डी. एन. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेण्यात येणार आहे. महिला बचत गट व मायक्रो फायनान्सच्या सर्व कंपन्यांचे कर्ज माफ होण्यासाठी यापुढे पाठपुरावा केला जाणार आहे. २ रोजी सकाळी ११ वाजता नगर कृषी उत्पन्न बाजार समिती ते नगर जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी महिलांच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात तसेच सरचिटणीस अनिल चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या मोर्चात जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देवीदास खेडकर, दत्ता कोते, बाबा शिंदे, सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितिन म्हस्के, महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे यात सहभागी होणार आहेत. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच महिला बचत गट व मायक्रो फायनान्स सह इतर कंपन्यांचे कर्ज घेतलेल्या महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment