कर्जबाजारीपणा.. पित्याने मुलीसह स्वतःलाही संपवले

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कर्जबाजारीपणाला कंटाळून पित्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलीचा खून करून स्वतःही आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या ३ वर्ष वयाच्या मुलीचा तोंड दाबून खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दवणगाव येथील अनिल दिनकर पाळंदे (वय ४७) याने गुरुवारी रात्री ११ वाजेनंतर स्वतःच्या आदिरा अनिल पाळंदे(वय-३ वर्ष) हिच्या तोंडावर उशी दाबून तिचा जागीच खून करून केला. त्यानंतर अनिल याने घराच्या छताला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post