एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
बॉलिवूडमधील चित्रपटात झळकलेली व छोट्या पडद्यालवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी ही गरोदर असून तिने इंस्टाग्रामवरून एक क्यूट व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती फॅन्सला दिली आहे. अनिता व तिचा नवरा रोहित रेड्डी यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना देखील फार आवडला असून त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अनिता व रोहितने शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी आतापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवला आहे. सुरुवातीला डेटिंग नंतर लग्नासाठी प्रपोज करणं नंतर लग्न करणं व आता बाळाचे आगमन असा प्रवास या व्हिडीओत त्यांनी दाखवला आहे. हे या जोडप्याचे पहिले बाळ आहे.
अनिता व रोहित हे जिममध्ये भेटले होते. तिथे त्यांची ओळख झाली व कालांतराने या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अनिता व रोहितने 2013 साली शाही विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
Post a Comment