50 हजारापेक्षा कमी किंमत असलेल्या ‘या’ आहेत टॉप बाईक

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारतात 50 हजारपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या बाईक्स अधिक पसंद केल्या जातात. या बाइक्स इंधन एफिशियंट असून अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध असतात. भारतात उपलब्ध असलेल्या दोन स्वस्त बाईक ज्या तुमच्या बजेटमध्ये सहज बसतील..

Hero HF Delux
Hero Hf Deluxe Bs6 मध्ये 97.2cc एअर कुल्ड 4 स्ट्रोक सिंगल सिलिंडर OHC इंजिन देण्यात आले आहे. जे 8000 Rpm वर 7.91 Hp पॉवर आणि 6000 Rpm वर 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची लांबी 1965 मिमी, रुंदी 720 मिमी, उंची 1045 मिमी आहे. तसेच या बाईकच्या इंधन टाकीची क्षमता 9.6 लीटर इतकी आहे. Hero Hf Deluxe च्या पुढचा भाग 130 मिमी ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आले आहे.

किंमत
Hero Hf Deluxe Bs6 ची प्रारंभिक किंमत 49,000 रुपये इतकी आहे.

Bajaj CT 100

Bajaj CT 100 मध्ये 102 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे 7500 आरपीएम वर 7.9 पीएस पॉवर आणि 5500 आरपीएम वर 8.34 आरपीएम टॉर्क जनरेट करते. बाईकची 100 ची लांबी 1945 मिमी, रुंदी 752 मिमी आणि उंची 1072 मिमी आहे. या बाईकचे व्हीलबेस 1235 मिमी आहे. तसेच या बाईकचे वजन 115 किलो आहे.

किंमत
कंपनीने Bajaj CT 100 ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत ही 44,358 रुपये इतकी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post