बँक, सिलिंडर अन् रेल्वे.. रविवारपासून बदलणार 'हे' नियम

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बँक व्यवहार, गॅस सिलेंडर व रेल्वे प्रवासाबाबतच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आला असून, ते रविवारपासून (१ नोव्हेंबर) देशभर लागू होणार आहेत. या नियमांचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. देशात १ नोव्हेंबरपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सामान्यांवरही होणार आहे. १ नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडर बुकिंग, बँक चार्जपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. तसेच रेल्वेद्वारेही वेळापत्रकात काही बदल करण्यात येणार आहेत.

नव्या नियमापासून १ नोव्हेंबरपासून घरगुती स्वयंपाकासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडर तुमच्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया बदलणार आहे. गॅस सिलिंडर बूक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. जेव्हा सिलिंडर घरी येईल तेव्हा सिलिंडर पोहोचवणाऱ्यांना तो ओटीपी द्यावा लागेल. सिस्टममध्ये त्या ओटीपीची पडताळणी केल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर देण्यात येईल. नव्या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जसा फायदा होणार तशाच त्यांना काही समस्यांही उदभवणार आहे. जर ग्राहकांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक चुकीचा असेल तर त्यांना सिलिंडर मिळणार नाही. नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्य़ाचे आवाहन गॅस कंपन्यांकडून करण्यात आले आहे. मात्र, कमर्शिअल एलपीजी सिलिंडरसाठी हा नियम लागू असणार नाही.

इंडेन गॅसने बदलला बुकींग क्रमांक
इंडेनचे गॅसच्या ग्राहकांना जुन्या क्रमांकावर आता गॅस बूक करता येणार नाही. कंपनीने गॅसच्या बुकींगसाठी आपल्या ग्राहकांना एक नवा क्रमांक पाठवला आहे. इंडेनच्या ग्राहकांसाठी आता देशभरात 7718955555 हा एकच क्रमांक असणार आहे.

बँकेत आता पैसे काढण्यासाठी शुल्क
बँकांमध्ये आता पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी शुल्कही द्यावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदाने याची सुरुवातही केली आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास यापुढे ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे. लोन खात्यासाठी जे ग्राहक तीन वेळापेक्षा अधिक वेळा रक्कम काढतील, त्यांना १५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर बचत खात्यांमध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळा पैसे जमा करता येतील. परंतु चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना ४० रुपये मोजावे लागतील.

रेल्वे वेळापत्रक बदलणार
१ नोव्हेंबरपासून रेल्वेचे वेळापत्रक बदलणार आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल होणार होता. परंतु काही कारणास्तव बदल १ नोव्हेंबरपासून केला जाणार आहे. देशात धावणाऱ्या १३ हजार प्रवासी रेल्वे आणि ७ हजार मालगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. देशात धावणाऱ्या राजधानी गाड्यांच्याही वेळेत बदल होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post