बिअरच्या किमतीत झाली घसरण?

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिली :
अवघ्या देशात सध्या कोरोना विषाणूशी कडवी झुंज सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचं अस्त्र वापरण्यात आलं. त्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. मात्र, बिअरप्रेमींसाठी मात्र चांगली बातमी असून बिअरच्या किमतीत घट झाल्याचं वृत्त आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाऊनचा परिणाम बिअर व्यवसायावरही झाला असून त्यामुळे बिअरच्या किमतीत घट झाली आहे. मात्र, ही घट कोलकाता या पश्चिम बंगालच्या राजधानीतच झाली आहे. वेस्ट बेंगाल ब्रिव्हरेज कॉर्पोरेशनने बुधवारी एक परिपत्रक जारी केलं असून त्यात बिअरच्या नवीन घटलेल्या किमतींचा उल्लेख आहे. लाईट बिअरची किंमत 25 ते 40 टक्क्यांनी घटली असून स्ट्राँग बिअरची किंमत 15 ते 20 टक्क्यांनी घसरली आहे.

किमती घटण्यामागे महत्त्वाचं कारण कोरोना आणि लॉकडाऊन आहे. मार्च ते जुलै 31 हाच या व्यवसायाचा मुख्य सिझन असतो. मात्र नेमकं याच काळात लॉकडाऊन झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आता विक्री वाढवणं हा नुकसान भरून काढण्यासाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे त्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे, अशी माहिती एका विक्रेत्याने दिली आहे. अनेकांनी हे रेट्स हॉटेल आणि रेस्टराँसाठी चांगले असल्याचं म्हटलं आहे. या किमतीमुळे हॉटेलच्या व्यवसायावरही सकारात्मक परिणाम दिसून येईल, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post