दररोज खा बीट..! विचारही केला नसेल असे होतील फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बऱ्याच वेळा सॅलड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीट आवर्जुन दिलं जातं. अनेकांना बीट मनापासून आवडत नाही. मात्र, बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याप्रमाणेच एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग आणायचा असेल तर त्यामध्ये बीटाचा वापर करावा. बीटामुळे पदार्थाला अत्यंत सुंदर रंग येतो. त्याचप्रमाणे अनेक गृहिणी बीटापासून वेगवेगळे पदार्थदेखील करत असतात. यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी असे अनेक पदार्थ आहेत. विशेष म्हणजे नावडतीचं हे बीट अत्यंत पौष्टिक असून ते खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत. हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊयात.

१. घशात जळजळ होत असल्यास बीटाचा रस घ्यावा.

२. अम्लपित्त, पित्त होणे या समस्या दूर होतात.

३. मूळव्याधीच्या समस्येवर आराम मिळतो.

४.रसक्षयावर आराम मिळतो.

५ थकवा दूर होतो.

६. हातापायांमध्ये ताकद येते.

७. वजन कमी होते.

८. दिर्घकाळचा पांडू विकार बरा होतो.

९. बीटामुळे शरीरातील ताकद वाढते.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post