काकडीच्या बिया खाण्याचे गुणकारी ११ फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणताही ऋतू असला तरीदेखील बाजारात गेल्यावर काकडी सहज उपलब्ध होते. साधारणपणे काकडी कोथिंबीर,सॅलड किंवा काकडीचा रस यांसाठीच वापरली जाते. मात्र, काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो. तसंच काकडीच्या बियादेखील तितक्याच फायदेशीर आहेत. अनेक ठिकाणी काकडीच्या बिया वाळवून त्यांच्या मगज म्हणून वापर केला जातो. त्यामुळे काकडीच्या बियांचे फायदे कोणते ते पाहुयात..

१. मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

२. मासिक पाळीत सतत पोट दुखणे किंवा जास्त होणारा रक्तस्त्राव यामुळे कमी होतो.

३.लघवी कमी होणे किंवा अडखळा निर्माण होणे यावर बिया गुणकारी.

४. त्वचेचा रंग सुधारतो.

५.आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात.

६. घशात सारखी कोरड पडत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्यात.

७. ताप येत असल्यास काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्यासोबत घ्याव्या.

८. वजन वाढते.

९ पित्त कमी होते.

१०. त्वचेवरील डाग,मुरूम कमी होतात.

११. उन्हाळ्यात होणाऱ्या शारीरिक तक्रारी कमी होता.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post