एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अबाल-वृद्धांपासून साऱ्यांना आवडणारी एकमेव भाजी म्हणजे बटाटा. कोणत्याही भाजीमध्ये बटाटा घातला की त्याची चव द्विगुणित होते. त्यामुळे भारतीय स्वयंपाक घरात बटाट्याचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे बटाट्यापासून अनेकविध पदार्थदेखील करता येतात. यामध्ये बटाट्याची भाजी, बटाट्याचे परोठे, बटाट्याचे काप,बटाट्याचं रायतं असे अनेक पदार्थ करता येतात. त्यामुळे बटाटा घराघरात आवडीने खाल्ला जातो. विशेष म्हणजे बटाटा खाण्याचे अनेक फायदे आहेत. आता हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
१. बटाट्यामध्ये शीतल आणि मधूर रस गुणधर्म आहेत. त्यामुळे तो मलावष्टंभक आहे.
२. अशक्तपणा येत असल्यास बटाटा खावा.
३. स्काव्र्ही या विकाराच्या रुग्णांकरिता बटाटा गुणकारी आहे.
४. सालासकट बटाटा खाल्यास दात बळकट होतात.
५. चटका बसल्यास किंवा भाजल्या त्या ठिकाणी फोड येतो. अशा फोडावर बटाटा उगाळून लावावा.
६. बाळंतिणीनं दूध वाढण्याकरिता बटाटा फायदेशीर आहे.
७. तोंड आल्यास बटाटा उकडून खावा.
८. बटाटय़ाच्या पानात जवखार आहे. लघवी अडल्यास बटाटय़ाच्या पानांचा रस घ्यावा.
कच्चा बटाटा खाण्यामुळे होऊ शकते ‘ही’ समस्या
१. कच्चा बटाटा दाह निर्माण करणारा आहे.
२. बटाटा बद्धकोष्ठ वाढवतो.
३. सतत सर्दी, शिंका यांचा त्रास असणाऱ्यांनी बटाटा खाऊ नये.
४. बटाटा जास्त खाल्ला तर अग्नी मंद होतो.
५. मधुमेही व रक्तात चरबी वाढलेल्या, स्थूल व्यक्तींनी बटाटा पूर्ण वर्ज्य करावा.
६.शरीरात सर्वत्र सूज आली असताना बटाटा वर्ज्य करावा.
७. वारंवार जुलाब, पोटदुखी तक्रार असणाऱ्यांनी बटाटा खाऊ नये.
(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment