एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
गौरी-गणपतीसारखे सण, उत्सव आले की अनेक घरांमध्ये घोसाळ्याच्या भज्यांचा वास घमघमू लागतो. साधारणपणे आपल्याला कांदाभजी, बटाटाभजी, पालकभजी असे भज्यांचे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये घोसाळ्याची भजीदेखील तितकीच खुमासदार लागतात. बऱ्याच वेळा घोसाळ्याची भजी खाण्यासाठी लोक नाकं मुरडतात. मात्र, घोसाळ्याची भजी किंवा भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मुळात घोसाळं हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात..
१. लघवी साफ होते.
२. कफ झाल्यास घोसाळ्याचा रस प्यावा. त्यामुळे उलटी होऊन कफ बाहेर पडतो.
३. पोट साफ होतं.
४. जखम बरी होते.
५. पोटाचा घेर कमी होतो.
६.मुतखड्यावर गुणकारी
७. थकवा दूर होतो.
Post a Comment