शरीरासाठी फायदेशीर आहे दालचिनी, असा करा वापर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दालचिनी शरीरासाठी फायदेशीर आहे. मात्र, तिचा वापर योग्य पद्धतीनेच करणे आवश्यक आहे. दालचिनीचा वापर कसा करावा याबाबत संशोधक, आहारतज्ञ, आरोग्य अभ्यासकांनी काही मतं मांडली आहेत. याबाबत जाणून घेऊयात..

 • दालचिनीमधील अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ते तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात.
 • मधुमेहींसाठी दालचिनी गुणकारी मानले जाते. दालचिनीमुळे शरीरातील रक्त शर्परा आणि इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दालचिनीचे सेवन केल्यास मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकेल.
 • सांधेदुखीचा त्रास होत असल्यास त्यावर दालचिनी चांगला पर्याय आहे. गरम पाण्यात दालचिनी पावडर आणि मध मिसळून ते मिश्रण प्यायल्याने आराम मिळतो.
 • पोटदुखी आणि गॅसची समस्या असल्यास दालचिनी आणि मध एकत्र मिसळून घ्यावे. त्याने फायदा होतो.
 • डोकं दुखत असल्यास दालचिनी पाण्यात वाटून डोक्यावर लेप लावावा. आराम मिळतो.
 • केसगळतीच्या समस्येने त्रस्त असल्यास ऑलिव्ह ऑइलमध्ये मध आणि दालचिनी एकत्र करून त्याची पेस्ट आंघोळीच्या अर्धा तासआधी केसांच्या मुळाशी लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केसगळती कमी होईल.
 • सर्दी झाली असल्यास दालचिनी पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या. या पाण्यात मध मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.
 • वजन कमी करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त आहे. त्यासाठी दालचिनी पाण्यात उकळून गाळून घ्यायची. नंतर त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या.
 • जेवणानंतर दालचिनी, मिरीपूड आणि मध एकत्र करून त्याचे चाटण घेतल्यास पोट फुगत नाही.
 • हृदयविकारावर दालचिनी गुणकारी आहे. दालचिनीमुळे रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या.
 • दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे विकार कमी होतील.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय/घरगुती उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post