जिरे सेवनाचे काय आहेत फायदे?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सर्वसामान्य व्यक्ती व बाळंतीण महिलांना विविध व्याधींवर जिरे फार उपयुक्त ठरतात. काय आहेत जिरे सेवनाचे फायदे पाहुयात..

  • जर वारंवार उचकी लागत असेल तर जिऱ्याचे सेवन केल्याने उचकी बरी होते.
  • बाळंतीण बाईने जिऱ्याचे सेवन केल्यास अंगावर दूध चांगले येते.
  • जिरे बाळंतीण महिलांसाठी श्रेष्ठ औषधी आहे.
  • जिरे आणि खडीसाखर याचे चूर्ण घेतल्यास स्त्रियांना नेहमी होणाऱ्या श्वेतप्रदर आणि रक्तप्रदर या विकारावर ते अत्यंत गुणकारी आहे.
  • तज्ञांच्या मते जिऱ्याचे चूर्ण नियमित प्राशन केल्यास शरीरातील अतिरिक्त गर्मी कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो.
  • जिऱ्याचे पाणी किंवा चूर्ण रोज घेतल्यास रातआंधळेपणा कमी होतो.
  • जिऱ्याचे सेवनाने मूळव्याध बरा होण्यास मदत होते.
  • जिऱ्याने रोज डोळे धुतल्यास डोळ्याचे तेज वाढून, डोळ्याचे बरेच विकार दूर होण्यास मदत होते.
  • जिरे पाण्यात मीठ टाकून घेतल्यास पोटातील कृमी बाहेर पडतात.
  • जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे होणे किंवा गॅस होणे या सारख्या व्याधीवर देखील जिरे सेवन उपयुक्त आहे.

- डॉ. शुभदा शिंगणे
ईमेल : miki3330@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post