एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा पदार्थ म्हणजे मीठ. कोणत्याही पदार्थाची चव ही मीठामुळे वाढते. त्यामुळे मीठ हा स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. परंतु, मीठ हे केवळ पदार्थाची चव वाढविण्यासाठीच उपयुक्त नसून त्याचे दैनंदिन जीवनात काही अन्य फायदेदेखील आहेत. विशेष म्हणजे कपड्यांवरील डाग घालवण्यापासून ते झाडांच्या वाढीपर्यंत मीठाचे विविध उपयोग आहेत. आता हे नेमके फायदे आणि उपयोग कोणते ते जाणून घेऊयात.
१. कपड्यांवर किंवा रुमालावर एखादा डाग लागला असेल तर तो मीठामुळे काढता येऊ शकतो. यासाठी डाग लागलेले कपडे काही वेळ मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवावावे. त्यानंतर हे कपडे धुवावेत.
२. दात घासण्यासाठी नवीन ब्रश आणल्यानंतर तो काही वेळ मीठाच्या पाण्यात ठेवावा. यामुळे ब्रश बराच काळ टिकतो.
३. झाडांची योग्य वाढ होत नसेल किंवा वारंवार किड लागत असेल तर मीठाचं पाणी करुन ते झाडांवर शिंपडावं. त्यामुळे झाडांचं वयदेखील वाढतं.
४. घरात सतत मुंग्या होत असतील तर अशा ठिकाणी मीठ टाकावे.
५. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सने त्रस्त असाल तर मीठाचा स्क्रब म्हणून वापर करा. यासाठी चेहरा थोडासा ओला करुन त्यावर मीठाने हलक्या हाताने चोळा. यामुळे ब्लॅकहेड्स दूर होतील.
६.कपातील चहाचे डाग दूर करण्यासाठी मीठाचा वापर करावा.
(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment