'आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा'

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं. हरयाणामधल्या सभेत ते बोलत होते. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

“राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकलं असतं. चीनचं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा,” असं म्हणत निलेश राणे निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून राहुल गांधींना टोला लगावला. “राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए. के. अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण अँटनी यांनी हसत उत्तर दिलं, “आमच्या चर्चा सुरू आहेत.” चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?,” असंही ते म्हणाले.


काय म्हणाले होते राहुल गांधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं. संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की भारताची कोणत्याही जमिनीवर चीनने कब्जा केलेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरुन स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्यानं पाऊल ठेवलं आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली. जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किमी मागे ढकललं असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची ताकद, शेतकऱ्याची ताकद, मजुराची ताकद समजत नाही,” असंही त्यांनी म्हटलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post