‘ही’ लक्षणे दिसल्यास व्हा सावध.. मानसीक आरोग्याकडे द्या लक्ष..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्यासाठी वेळ मिळत नाही. जेवणाची बदलणारी वेळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव, सुखासीन जीवनशैली यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असते. काही आजारांची लक्षणे दिसतात. मात्र, अनेकदा मानसीक त्रास कळत नसल्याने मानसीक आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

अनेकदा विनाकारण चिडचिड वाढणे, अस्वस्थ वाटणे, नैराश्य येणे यासारख्या गोष्टींमुळे मानसीक तणावाचे संकेत मिळतात. ताणतणाव कमी झाल्यावर हे त्रास कमी होतात. मात्र, असे त्रास वाढणे ही मानसीक आरोग्य बिघडण्याची लक्षणे असतात. त्यामुळे मानसीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याची चाचणी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी काही प्रश्न तयार केले आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तरावरून मनोविकार तज्ज्ञ मानसीक आरोग्याचे निदान करतात. 


 • लोकांमध्ये मिसळणे आणि आवडत्या छंदासाठी वेळ देणे कमी केले आहे काय
 • जेवण, झोप, विचार करणे, आहार, विहार याबाबतच्या सवयीत आमुलाग्र बदल झाले आहेत काय
 • तुम्ही सगळ्यांना टाळत असून एकटे राहणे पसंत करता काय
 • भविष्याबाबत मनात नेहमी नकारात्मक विचार येतात काय
 • दैनंदिन काम अचानक कठीण किंवा अडचणींचे वाटत आहे काय
 • मूडमध्ये अचानक विनाकारण बदल होतात काय, कधी खूप आनंदी तर कधी खूप उदास, निराश वाटते काय
 • मन एकाग्र करण्यात अडचणी येतात काय, कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही काय
 • स्मरणशक्ती कमी झाली आहे काय किंवा कोणत्याही गोष्ट समजण्यास अडचणी येतात काय
 • दररोज रात्री निराश वाटत असून श्वासांची गती बदलते काय
 • मनावरील दडपण वाढले आहे, असे वाटत राहते काय
 • स्वभावात बदल झाल्याचे जाणवते काय
 • कधीतरी खूप रडावे किंवा खूप हसावे असे वाटते काय
 • जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी बोलताना अस्वस्थ वाटते काय


या प्रश्नांची उत्तरे हो असल्यास तुम्ही तुमच्या मानसीक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आहार, विहारात बदल करणे, पौष्टिक आहार घेणे, ताणतणावापासून दूर राहणे गरजेचे असते. तसेच ध्यानधारणा आणि व्यायाम केल्याने ताणतणाव कमी होतात. सकळी फिरण्याने मनाची अस्वस्थता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. तर कुठेतरी सहलीसाठी गेल्याने मन उत्साही होते. कधीतरी एखाद्या समस्येमुळे, अडचणीमुळे किंवा ताणतणावामुळे यातील काही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी येऊ शकतात. मात्र, अडणीतून बाहेर पडल्यावर अस्वस्थता कमी होते. त्यामुळे वरील प्रश्नांची होकारार्थी उत्तरे यणार नाही, अशी जीवनशैली स्वीकारण्याचा सल्ला मनोविकार तज्ज्ञ देतात. तसेच काही प्रश्नांची होकारार्थी उत्तर आल्यास त्याचे कारण शोधून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकतात. मात्र, मानसीक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञ सांगतात. 

 

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post