एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
सध्या बॉलिवूडमध्ये गोड बातम्यांचा मोसम आहे. अनुष्का शर्मा, अनिता हंसनंदानी, सागरिका घाटगे या अभिनेत्रींची गुड न्यूज आधीच चाहत्यांना कळली आहे. आता यात अजून एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.
ही अभिनेत्री म्हणजे अमृता राव. इश्क विश्क या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अमृताने विवाह, सत्याग्रह, मैं हूं ना, ठाकरे अशा अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या. रेडिओ जॉकी असलेल्या अनमोल सोबत तिने संसारही थाटला. आता या संसारात एक गोड चाहुल लागली असून अमृता गर्भवती असल्याचं वृत्त आहे. या जोडप्याने अधिकृतरित्या जाहीर केलं नसलं तरी तिच्या एका फोटोवरून हे गुपित उघड झालं आहे. एका डॉक्टरच्या क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या या जोडीचा फोटो व्हायरल झाला असून त्यावरूनच अमृता गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्याशी माध्यमांनी संपर्क साधला तेव्हा तिने या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या आपल्या आयुष्यातला हा आनंददायी टप्पा अनुभवत असल्याचं मत अमृताने व्यक्त केलं आहे. लॉकडाऊनपूर्वीच ही गोड बातमी कळली आणि लॉकडाऊनमुळे एकमेकांसोबत खूप चांगल्याप्रकारे वेळ घालवता आला, असं मत तिने व्यक्त केलं आहे.
Post a Comment