'या' सिनेमात रिंकू सोबत झळकणार 'नाळ'मधील चैत्या

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील बाल कलाकार श्रीनिवास पोकळे म्हणजेच चैत्या आपल्या उत्तम अभिनयामुळे संबंध महाराष्ट्राचा लाडका बनला आहे. नाळ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे श्रीनिवास चे सर्वांनीच कौतुक केले.

नाळ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी श्रीनिवास केवळ आठ वर्षांचा होता. आता तो छूमंतर या मराठी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. अद्याप या बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, छूमंतर चित्रपटात श्रीनिवास पोकळे बरोबर सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना लंडनमध्ये आहेत. नुकतेच रिंकू राजगुरूने इंस्टा स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला असून, व्हिडीओत रिंकूसोबत श्रीनिवास मस्ती करताना दिसतो आहे.

Post a Comment

Previous Post Next Post