राहुल गांधींसमोर अखेर भाजपा सरकारची माघार

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात रॅली काढली असून हरियाणामध्ये पोलसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांची रॅली काँग्रेसचं सरकार असणाऱ्या पंजाबमधून हरिणायात प्रवेश करत असतानाच ती पोलिसांनी अडवली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात तीन दिवसांसाठी रॅली काढण्यात आली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्याला पाच हजार तास वाट पहावी लागली तरी हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यानंतर एका तासातच हरियाणा सरकराने मोजक्या लोकांना रॅलीसाठी परवानगी दिली.


“त्यांनी आम्हाला हरियाणा सीमेवर थांबवलं. जोपर्यंत पुढे जाण्याची परवानगी देत नाहीत तोपर्यंत हटणार नाही. जर यासाठी दोन तास लागले तरी चालतीतल. ६, १०, २४, १००, २००, ५००…कितीही तास लागू देत नाही. मी अजिबात हलणार नाही,” असं राहुल गांधी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं.

“जेव्हा ते परवानगी देतील तेव्हा मी पुढील प्रवास सुरु करेन. तोपर्यंत मी शांतपणे इथे वाट पाहीन,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं. हाथरसला जाताना घेतलेली भूमिका राहुल गांधी यांनी इथेही घेतलेली पहायला मिळाली.

राहुल गांधी यांनी पोलिसांनी रोखल्यानंतर ट्विटही केलं होतं. यामध्ये ते म्हणाले होते की, “हरियाणा सीमेवरील पुलावर आम्हाला थांबवण्यात आलं आहे. मी येथून हलणार नाही, वाट पाहण्यात मला काही त्रास नाही. १ तास, ५ तास, २४ तास, १०० तास, १००० तास किंवा ५००० तास”.

काँग्रेस कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलीस बॅरिकेडच्या सहाय्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर काही वेळातच हरियाणामधील भाजपा सरकारने १०० लोकांना पुढे जाण्याची परवानगी दिली. राहुल गांधींसोबत तीन ट्रॅक्टर्सना परवानगी दिली. पंजाबमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना यामुळे सीमेवरुन माघारी फिरावं लागलं.

Post a Comment

Previous Post Next Post