विखेंच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बैठका; युवकांची गर्दी

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असणार्‍या शिर्डी विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बैठकांना सुरुवात झाली. बैठकांना युवकांची मोठी गर्दी करत काँग्रेसने तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

राज्यातील सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर काँग्रेसने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात पुन्हा संघटना मजबुतीसाठी अभियान छेडले आहे. युवकांची मोट बांधण्यासाठी युवक काँग्रेससह एनएसयुआयला पक्षाने मैदानात उतरवले आहे. नगर शहर जिल्हाध्यक्ष व एनएसयुआयचे जिल्हा समन्वयक किरण काळे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा यांनी जिल्हाभरात दौरे सुरू केले आहेत. पहिल्याच दिवशी विखेंच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन या दौर्‍याला सुरूवात करण्यात आली. यावेळी शिर्डी मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे, राहता समन्वयक राजेंद्र बोरुडे,सहसमन्वयक गौरव डोंगरे आदी उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले की, शिर्डी मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे उमेदवार होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काहींनी अचानक भाजपमध्ये उडी मारल्यामुळे पक्षात जागा रिकामी झाली. ऐनवेळी पक्षाने सुरेश थोरात यांना उमेदवारी दिली. थोरात यांनी न डगमगता निवडणूक लढविली. आजच्या बैठकीत युवकांची झालेली गर्दी ही आगामी काळातील बदलाची नांदी आहे. युवकच या मतदारसंघांमध्ये परिवर्तन करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महसूलमंत्री थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक, विद्यार्थी संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. तरुणांच्या मोठ्या उपस्थितीमुळे बैठकीमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक तरुण विद्यार्थी, युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाशी जोडण्यासाठी इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विक्रांत दंडवते, उमेश शेजवळ, संदीप गुंड, शेखर सोसे, अमोल बनसोडे, तुषार पोटे, प्रल्हाद शेळके, नवनाथ आंधळे, प्रशांत कोते, उत्तमराव घोरपडे, गणेश गागरे, सुभाष निमोणे, मुन्नाभाई शेख, नितीन सदाफळ, गोविंद भडांगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले. युवक काँग्रेस प्रदेश सचिव प्रसाद शेळके यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post