जाणून घ्या.. कोथिंबीर खाण्याचे फायदे..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक म्हणजे कोथिंबीर. कोणतीही भाजी,आमटी किंवा एखादा चटकदार, झणझणीत वा मसालेदार पदार्थ केला की त्यावर थोडीशी कोथिंबी भुरभुरली की त्या पदार्थाची चव काही निराळीच लागते. त्यासोबतच तो पदार्थ आकर्षकही दिसून लागतो. मात्र, कोथिंबीर केवळ सजावटीसाठी नाही. त्यामुळे त्यापासून अनेक स्वतंत्र पदार्थदेखील केले जातात. यामध्ये कोथिंबीर वडी, कोथिंबीरची हिरवी चटणी अशा अनेक गोष्टी केल्या जातात. कोथिंबीर ही शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून तिचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

मूतखडा : सध्याच्या काळात अनेक जण मूतखडा म्हणजेच स्टोनच्या समस्येने त्रस्त आहेत. स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी रोज सकाळी उठल्यावर कोथिंबीरचे पाणी प्यावे. यासाठी पाण्यात कोथिंबीर टाकून ते पाणी उकळवावे. त्यानंतर हे पाणी गाळून ते रिकाम्या पोटी प्यावे.हे पाणी प्यायल्यास मूत्रातून या स्टोनचा विसर्ग होतो.

लघवी साफ होण्यास मदत :
१ ग्लास पाण्यात २ चमचे बारीक केलेली धने पावडर घालावी. ५ ते ७ मिनीट उकळून घेऊन गार करावे. त्यानंतर गार करुन सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना प्यायल्यास लघवी साफ होते.

पोटाच्या समस्यांपासून सुटका :
२ कप पाण्यात जीरे आणि कोथिंबीर टाकावी. त्यानंतर यामध्ये चहा पावडर आणि बडिशेप टाकावी. हे मिश्रण २ मिनिटे गॅसवर ठेऊन उकळावे. आवडीनुसार साखर आणि आले टाकून २ ते ३ उकळ्या काढून घ्याव्यात. हे मिश्रण गाळून प्यायल्यास गॅसच्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि पचनाची यंत्रणा सुधारण्यास मदत होते.

नाकातून होणाऱ्या रक्तस्त्राव थांबतो :
कोथिंबीरीच्या २० ग्रॅम पानांमध्ये कापूर घालून ते मिक्सरवर बारीक करावे. हा रस गाळून घेऊन दोन थेंब दोन्ही नाकपुडीत टाकावेत. याबरोबरच हा रस कपाळाला लावून हलक्या हाताने मालिश केल्यास नाकातून येणारे रक्त लगेच थांबते.

डोळ्यांची आग कमी होण्यास उपयुक्त :
बडिशेप, साखर आणि धने समप्रमाणात घेऊन ते मिक्सर करुन घ्यावे. जेवणानंतर ही पावडर ६ ग्रॅम खावी. त्यामुळे डोळे आणि हातापायांची होणारी आग कमी होते.

त्वचेसाठी अतिशय उपयुक्त :
कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. कोथिंबीर आणि धण्याच्या वापराने मधुमेह पूर्णपणे आटोक्यात येण्यास मदत होते. तजेलदार त्वचेसाठीही कोथिंबीर अतिशय उपयुक्त असते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post