‘राष्ट्रवादी’ने जागवल्या पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेच्या आठवणी!

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

गतवर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांसह अख्ख्या महाराष्ट्राला पाहयाल मिळाले. त्यावेळी भर पावसात शरद पवारांनी घेतलेली सभा ही ऐतिहासिक सभा ठरली. आज याच सभेला वर्षपुर्ती झाली. यानिमित्त राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी त्यांच्या भरपावसातल्या सभेचा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले. वयाच्या ७९ व्या वर्षी भर पावासात केलेला प्रचार आणि त्यांचा उत्साह सातऱ्यासह महाराष्ट्रभर गाजला. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांनी त्यावेळी दाखवलेली जिद्द आणि जिगर पाहून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता.

पवारांच्या या ऐतिहासिक सभेला उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर भाजपने केलेल्या वक्तव्याची आठवण करून देत खोचक चिमटे काढले आहेत. 'त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला जनता चिंब भिजली दिल्ली मात्र थिजली' अशी कॅप्शन देत सातऱ्यात झालेल्या सभेचा व्हिडिओ राष्ट्रवादीने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओ 'दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र कधी विसरणार नाही' असे म्हटले आहे.

तसेच, आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येईन या वाक्याची आठवण करून देत दिल्लीच्या तख्ताला हादरा देणाऱ्या या दिवसाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

"मुसळधार पावसात वणवे भडकताना पाहिले l "मी पुन्हा येईल" बोलणारे डबक्यातच राहिले ll सातारच्या सभेने केले दिल्लीश्वरा थंडगार l अनाथ कौरवांनाही कळले "बाप" शरद पवार ll" (दिल्लीच्या तख्ताला हादरा देणाऱ्या या दिवसाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही) असे मिटकरी यांनी ट्विट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post