'ते' मंत्री असूनही प्रश्न मीच सोडवतो; कर्डिलेंचा मंत्री तनपुरेंना टोला

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''माझ्या विरोधात निवडून आलेल्या उमेदवाराला राज्य ऊर्जामंत्री पद मिळाले असले तरी शेतकरी विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येत आहे'', असा दावा राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केला. ''त्यांनी मंत्री पद हे फक्त नावालाच घेतले आहे. मी आमदार नसलो तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवत असल्यामुळे शेतकरी तसेच सर्व सामान्य नागरिक माझ्याकडे येत आहेत'', असा दावाही त्यांनी केला.

'मी आमदार नसताना शेतकरी आपले प्रश्‍न घेऊन येतात', असे स्पष्ट करून कर्डिले म्हणाले, 'राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी १0 वर्षे आमदारकीचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा विकास कामातून विश्वास निर्माण केला. त्यामुळे आजही मतदारसंघातील नागरिक विविध प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असतात. संकटाच्या काळामध्ये मी नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलो आहे. दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू करून दिल्या. आताही संकटाच्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जरुपी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देत आहे,' असे ते म्हणाले. नगर तालुक्‍यातील कापूरवाडी, बारा बाभळी, सोनेवाडी व मेहेकरी येथील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळते भांडवलाचे धनादेश वाटप करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, रघुनाथ लोंढे, अभिलाष धिगे, संतोष म्हस्के, मनोज कोतकर, रावसाहेब साठे, बाबासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post