भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला काय काय सुविधा किंवा सूट असतात?


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज
 
भारतामध्ये एखाद्या क्षेत्रात भरीव आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या, भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीला भारतातील सर्वांत मानाचा आणि सर्वोच्च असा 'भारतरत्न' हा सन्मान दिला जातो.

सध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळाच्या पानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे शब्द व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे.

हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना - पुरस्कार मिळाल्यानंतर सदरील खाली नमूद केलेल्या सुविधा मिळतात…

▪️ VVIP समकक्ष : भारतरत्नप्राप्त व्यक्तीला Very Very Important Person (VVIP) अर्थात ‘अति अति महत्वाची व्यक्ती’ असा दर्जा असलेल्या समकक्ष दर्जा दिला जातो.

▪️ संसदेच्या बैठका/चर्चासत्रात सहभाग : भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला संसद याठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये तसेच चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत मिळते

▪️ मोफत रेल्वे/विमानप्रवास : भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला देशभरात कुठेही रेल्वे आणि एयर इंडिया विमानाच्या प्रथम श्रेणीतून मोफत प्रवास करता येतो.

▪️ Z सुरक्षा (आवश्यकता असल्यास) : सरकारकडून भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला आवश्यकता असल्यास Z सुरक्षा पुरवली जाते.

▪️ विदेश तसेच देशान्तर्गत दौरा : भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती विदेशात गेल्यास तेथील भारतीय दूतावासातर्फे शक्य तितक्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच भारतातही कुठल्याही राज्यात सदरील पुरस्कारप्राप्त व्यक्ती गेल्यास त्या राज्यातील अतिथिगृहाची मोफत सुविधा सदरील व्यक्तींसाठी ते राज्य सरकार देते.

('कोरा' या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post