घरपोच सिलिंडर मिळविण्यासाठी येणार अडचण; काय आहे नवीन नियम?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

एलपीजी सिलिंडरच्या होम डिलीवरीच्या नियमांमध्ये पुढील महिन्यापासून महत्वपूर्ण बदल होत आहे. १ नोव्हेंबर २०२० पासून तुम्हाला घरपोच गॅस सिलिंडर मागवण्यासाठी ‘ओटीपी’ची आवश्यकता असणार आहे. रिपोर्टनुसार तेल कंपन्या गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकांच्या ओळखीसाठी नवी प्रणाली लागू करत आहेत. या प्रणालीस डिलेवरी ऑथेंटिकेशन कोड(डीएसी) असं नाव देण्यात आलं आहे.

‘डीएसी’ सर्वप्रथम १०० स्मार्ट शहारांमध्ये लागू केला जाणार आहे. यासाठी अगोदरपासूनच राजस्थानची राजधानी जयपूर येथे एक पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. या व्यवस्थेअंतर्गत सिलिंडरच्या बुकींगनंतर ग्राहकाच्या नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. जो ओटीपी सिलिंडर घरी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यास दाखवल्यानंतरच ग्राहकास सिलिंडर मिळणार आहे.

कोणाला होणार अडचण ?
जर ग्राहकाचा मोबाईल क्रमांमक अपडेट नसेल, तर सिलिंडर घरी आणून देणारा कर्मचारी एका अॅपद्वारे तो रियल टाइम अपडेट करेल व कोडी जनरेट करेल. ही व्यवस्था लागू झाल्यावर त्या लोकांची अडचण होणार आहे. ज्यांना मोबाईल क्रमांक चुकीचा आहे. चुकीच्या माहितीमुळे त्यांना गॅस सिलिंडरची डिलिवरी मिळणं बंद होऊ शकतं. १०० स्मार्ट शहारांनंतर अन्य शहरांमध्ये ही व्यवस्था लागू केली जाणार आहे. ही व्यवस्था कमर्शिअल सिलिंडरसाठी लागू नसणार.

Post a Comment

Previous Post Next Post