रताळं आवडत नाही? ‘हे’ फायदे वाचून तुम्ही कराल आहारात समावेशएएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज  
भारतीय आहारात कडधान्य, डाळी यांच्यासोबतच कंदमुळांनादेखील तितकंच महत्त्व आहे.त्यामुळे भारतीय स्वयंपाकघरात बीट, रताळं, मुळा हे सर्रास पाहायला मिळतं. आता या भाज्यांचं महत्त्व साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, रताळ्याविषयी फार कमी जणांना माहित आहे. साधारणपणे उपवासाच्या दिवशी बटाट्याला पर्याय म्हणून रताळं भाजून किंवा तुपात परतून खाल्लं जातं. परंतु, रताळं खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. 

हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊयात..

१. बारीक, कृश असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचं सेवन करावं.

२. उष्णतेमुळे शरीराची दाह होत असेल तर रताळे उकडून खावे.

३. लघवी करण्यास अडथळा येत असल्यास रताळे खावे.

४. शरीरावर सूज येत असल्यास रताळ्याचे काप करुन ते तुपावर परतून खावे.

५. वारंवार भूक लागत असल्यास रताळे खावे. रताळ्यामुळे भूक लवकर लागत नाही.

या तक्रारींमध्ये रताळे खाऊ नये

१. पोटात वारंवार गॅस होत असल्यास रताळे खाऊ नये.

२. रताळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण असल्यामुळे मधुमेह असलेल्यांनी रताळे खाऊ नये.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post