'तिच्या' हत्येचा नगरमध्ये झाला निषेध; हरियाणातील घटना

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हरियाणातील निकिता तोमर युवतीच्या निर्घृण हत्येचा नगरमध्ये अखिल सनातन धर्मच्यावतीने निषेध करण्यात आला.


भारतात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत १९४७ पासून आजपर्यंत कोणत्याच सरकारने आपल्या देशात ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असा दावा सनातन धर्मने केला आहे. हरियाणामधील निकिता तोमर या युवतीने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ नगरमधील अखिल सनातन धर्मच्यावतीने कापड बाजारातील भिंगारवाला चौक येथे निषेध नोंदवण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post