मूळव्याधीवर गुणकारी आहे कोरफड; जाणून घ्या फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेक वनस्पती अशा आहेत ज्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. यामध्ये तुळस, कोरफड, अडुळसा अशा अनेक वनस्पतींचा समावेश होतो. त्यातच कोरफडविषयी पाहायला गेलं. तर कोरफड अनेक त्वचाविकार किंवा अन्य शारीरिक समस्यांवर गुणकारी आहे. विशेष म्हणजे कोरफड आपण आपल्या बागेत किंवा घरातील कुंडीतही सहजरित्या लावू शकतो. त्यामुळे घरात कोरफड असण्याचे आणि त्याचे औषधी गुणधर्म कोणते ते पाहुयात.

१. कोरफडीचा रस हा अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे कोरफडीचा ताजा गर किंवा सुकलेला गर या दोहोंचा वापर अनेक रोगांवर केला जातो.

२. अपचन होत असल्यास कोरफडीचा गर, हळद आणि सैंधव मीठ एकत्र करुन घेतल्यास त्रास कमी होतो.

३. त्वचेवर भाजल्याचे किंवा चटका लागल्याचे व्रण, डाग असतील तर त्यावर कोरफडीचा गर लावावा.

४. हाता-पायांची आग होत असल्यास कोरफडीचा गर लावावा. शरीराला थंडावा मिळतो.

५. शौचास साफ होत नसल्यास कोरफडीच्या पाच मिलीलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा त्यामुळे पोट साफ होते. सोबतच भूकदेखील वाढते.

६.कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो.

७. नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.

८. डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post