रोज खा तुळशीचे पान, ‘या’ समस्यांवर मात करा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

देशातील बहुतांश घरांच्या बाहेर आपल्याला तुळशी वृंदावन दिसेल. तुळशीचे जसे धार्मिक, शास्त्रीय महत्व आहे तसेच यात औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात याला अग्रगण्य स्थान आहे. आयुर्वेदिक काढ्यात तुळशीच्या पानांचा आवर्जून वापर केला जातो. या वनस्पतीची पाने, फुले आणि फांद्याही बहुगुणी आहेत. जाणून घेऊया याचे 9 फायदे…

1. तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते, वजन कमी होते.

2. तुळशीच्या पानांचा रस तापाचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो, तसेच रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने सर्दी दूर होते.

3. अंगणात तुळस लावली तर अनेक छोट्या आजारांपासून सुरक्षित राहता येते. याच्या सेवनाने प्रतिकारशक्तीही वाढते.

4. तुळशीची पाने चघळल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. तसेच गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून गुळणी केल्याने दमा आणि ब्राँकायटिस असणाऱ्यांनाही आराम मिळतो.

5. अर्धांगवायू आणि संधिवात यामध्ये तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ लाभदायक ठरते.

6. तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर आराम मिळतो.

7. तुळशीची पाने खाल्ल्याने एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुळशीच्या पानांचे सेवन गुणकारी आहे.

8. किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रित मिश्रण प्यावे. यामुळे आराम मिळतो.

9. तुळशीचे पान खाल्ल्याने सर्दी, खोकला यावर तात्काळ आराम मिळतो.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post