लसूण खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण हा सगळ्यात जास्त वेळा भाज्यांमध्ये वापरला जातो. त्यामुळे भाज्यांना वेगळी चव आणि वास येतो. लसणाचे अनेक गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्नचे प्रमाण असते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण भरून काढण्याचे काम हे लसूण करतो. अनेक वेळा शरीरातील रक्तपेशी कमी झाल्या असतील त्यावेळी लसणाचा वापर केला जातो. रक्तामध्ये आयर्नचे प्रमाण कमी न करण्याचे काम एक लसणाची कुडी करते. यामुळे लसणाला आयुर्वेदामधेही जास्त महत्व दिले जाते.

लसणाचा होणारा फायदा

लसणाचा बहिरेपणा, कुष्ठ – रोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार, डांग्या खोकला, रक्तदोष, घटसर्प या साऱ्या आजारांवर वापर केला जातो.

अनेक वेळा लोकांना दमा किंवा श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर त्यावेळी सुद्धा लसणाचा वापर केला जातो. लसूण सुंकल्याने भोवळ येणाऱ्या माणसाला शुद्ध येते.

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो.

वजन घटविण्यात लसूण गुणकारी आहे. शरीरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमता लसणात आहे. त्यामुळे वजन कमी होते.

पचन विकार वाढवण्याची क्षमता ही लसणामध्ये जास्त प्रमाणात असते.

सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.

उच्च रक्त दाब कमी करण्यास तसेच त्यावर उपाय आणि जर याचा मोठा प्रमाणात त्रास असेल तर त्या वेळी लसणाचा आहारात नियमित समावेश असायला पाहिजे.

हृदय रोग हा सर्वात मोठा आजार आहे. जर योग्य वेळी त्याच्यावर उपाय नाही केले तर माणसाला आपला जीव गमवावा लागतो. लसूण त्यासाठी उपयोगी आहे.

लसणाच्या वापरामुळे कर्करोग या आजाराची भीती काही अंश कमी होते.

त्वचा विकार या समस्या जास्त वेळा पाहायला येत असतील तर अश्या वेळी लसूण खाणे, त्याचा काडा करून खाज येणाऱ्या भागात लावले तर लवकरात लवकर त्वचेच्या आजरापासून तुमची सुटका होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post