मोड आलेली कडधान्य खाण्याचे काय आहेत फायदे?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे सकस आहार घेणे शक्य होत नाही आणि यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. मात्र काही सोप्या पद्धतीचा आणि सहजासहजी भरपूर पोषणद्रव्ये असलेला आहार घेतल्यास शरीराला फायदा होऊ शकतो. यापैकीच एक म्हणजे मोड आलेली कडधान्य होय. मोड आणून कडधान्ये खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. म्हणून मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं.

मोड आलेली कडधान्य खाण्याचे फायदे :

● पोषक घटक : 'ड' जीवनसत्त्व, मिनरल आणि प्रोटीनचे प्रमाण कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराला त्याचा फायदा मिळतो.

● नियंत्रित वजन : मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच लठ्ठपणादेखील कमी होतो.

● रक्तवाढीसाठी उपयुक्त : अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमी असेल तर मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने हि तूट भरून निघते. त्यात आयन व कॉपरचे प्रमाण जास्त असते.

● सुंदर त्वचा : त्वचेच्या विविध समस्यांपासून मोड आलेली कडधान्य खाल्ल्यामुळे सुटका मिळते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी होऊन त्वचा तजेलदार बनते.

● इतरही फायदे : मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते तसेच हृदयाचे आरोग्यदेखील चांगले राहते.

('कोरा' या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post