प्रतिकारशक्ती वाढवा, वजन घटवा! थंडीत करा ‘या’ गोष्टीचे सेवन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

थंडी म्हटले की आजारपण आलेच. तसेच या दिवसात जास्त भूक लागत असल्याने वजनही वाढते, जास्त खाल्ल्याने पोटाचा घेर वाढतो. थंडीच्या दिवसात ताप, सर्दी, डोकेदुखी हे आजारही बळावतात. म्हणून चांगली प्रतिकारशक्ती हवी. आज आपण अशाच काही गोष्टीबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती तर वाढेल, मात्र वजन नियंत्रणात राहील.

  • थंडीच्या दिवसात गाजर, मुळा, काकडी, कांदा यासारख्या भाज्या, फळभाज्या ताज्या मिळतात. याच्या सेवनाने शरीराला प्रीबायोटिक मिळते आणि वजन घटण्यास मदत होते. यात पोषणमूल्य देखील जास्त असल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते.
  • वजन घटवण्यासाठी बाजरी फायदेशीर आहे. बाजरीची भाकरी, खिचडी याचे सेवन करणे चांगले. यात ‘व्हिटॅमिन बी’चे प्रमाण जास्त असते आणि केसांसाठी हे उपयुक्त असते. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि बाजरी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही व वजनही नियंत्रणात राहते.
  • थंडीत गावरान तुपाचे सेवन केल्याने शरीरातील गरमी कायम राहते. यात व्हिटॅमिन ए, डी, इ आणि के याचे प्रमाण जास्त असते. पोळी, भाकरी यावर तूप लावल्याने त्याची चव वाढते शिवाय यात असणाऱ्या सीएलएमुळे वजनही वाढत नाही.
  • शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळते. शेंगदाणे भिजवून किंवा भाजून खाऊ शकता. यात आढळणाऱ्या पोषण्मुल्ल्यांमुळे प्रतिकारशक्ती वाढते, तसेच भूक भागवण्यास मदत करते.
  • हिवाळ्यात हिरव्या भाज्याही जास्त मिळतात. आहारात पालक, मेथी, करडी, शेपू, पुदिना यासारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
  • थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन करावे. यामुळे हायपरटेन्शन कमी होण्यास मदत होते. तसेच तीळ उष्ण असल्याने शरीर गरम ठेवण्यास मदत होते. हिवाळ्यात याचे लाडू, चटणी किंवा भाकरीत टाकून सेवन केल्यास सर्व पोषणमूल्य मिळतात.
  • थंडीच्या दिवसात हरभराचे सेवन करावे. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
  • तसेच हिवाळ्यात मिळणाऱ्या पपई, पेरू, सीताफळ, केळी, सफरचंद यांचे सेवन करावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि त्या-त्या ऋतूत मिळणारी फळे खाल्ल्याने पोषणमूल्य देखील मिळतात. 

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

Post a Comment

Previous Post Next Post