डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट ठेवणं, आपल्या त्वचेची, चेहऱ्याची, आरोग्याची काळजी घेणं कठीण होतं. बाजारात चेहऱ्याची, डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मेकअपने डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं काही वेळासाठी झाकली जाऊ शकतात. केवळ सौंदर्यासाठी नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळ्या वर्तुळांचा विचार व्हायला हवा. हे एखाद्या आजाराचे सूचक लक्षण असू शकते. त्यामुळे ही वर्तुळे कशाने तयार झाली यांच्या मूळाशी जाऊन योग्य ते उपचार करायला हवेत. आज आम्ही तुम्हाला डोळ्याखाली काळे वर्तुळं का पडतात आणि ती घालवण्यासाठीचे घरगुती उपायांबद्दल माहिती सांगणार आहोत..

डोळ्यांखाली का होतात काळी वर्तुळं?
  • प्रमाणापेक्षा अधिक तणावात राहणं
  • तणावामुळे झोप पूर्ण न होणं
  • कंम्प्युटर, मोबाईलवर अधिक वेळ घालवणं
  • संतुलित आहार न घेणं
  • शरीरात आर्यनची कमतरता
  • आनुवंशिकता
  • शरीरात हार्मोनचं असंतुलन
  • मद्यपान, धुम्रपान सेवन
  • कमी पाणी पिणं

अशाप्रकारच्या सर्व समस्यांसाठी चांगला आहार, पुरेसा व्यायाम, मानसिक शांती आणि योग्य तेवढा वेळ झोप गरजेची असते. तरीही डोळ्याखाली वर्तुळं येत असतील तर, काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे :

कच्चा बटाटा
कच्च्या बटाट्याचे काप किंवा बटाट्याचा रस दररोज डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

कच्चा टोमॅटो
कच्चा टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. संपूर्ण चेहऱ्यावरही टोमॅटो लावू शकता. यामुळे चेहरा चमकदार आणि काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होऊ शकते.

लिंबू
लिंबाचा रस कापसाने डोळ्यांखाली लावल्याने, हळू-हळू फरक जाणवू शकतो.

बदाम तेल किंवा नारळाचं तेल
रोज रात्री नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांखाली लावून मसाज केल्याने फायदा होऊ शकतो.

गुलाब पाणी
गुलाब पाण्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेत जीवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. दिवसातून दोन वेळा 15 मिनीटांसाठी कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

पाणी
दिवसभरात 2 ते 3 लीटर पाणी पिण्यानेही फरक पडू शकतो. आहारात ताज्या फळांच्या रसाचा समावेश करु शकता.

पुरेशी झोप
तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल, तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या. विश्रांती ही महत्त्वाची आहे. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)


Post a Comment

Previous Post Next Post