कामाचा हिशोब 'फ्लेक्स'वरून मांडण्याची मला गरज नाही; रोहित पवारांचे राम शिंदेंना प्रत्युत्तर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महाविकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली, अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली. यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच फेसबुक पोस्टद्वारे आपल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे.

कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं...

Posted by Rohit Rajendra Pawar on Friday, October 23, 2020

रोहित पवार म्हणाले कि, कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर आमदार म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो, पण तरीही गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो.

कामाचा हिशेब मांडत असताना तो काही मी मतं घेण्यासाठी मांडत नाही आणि मतदान मागण्याच्या वेळीही हा हिशेब मला ‘फ्लेक्स’वर मांडून जाहिरात करण्याची गरज पडणार नाही. कारण तोपर्यंत बहुतांश कामे ही पूर्ण झाल्याने लोकांना डोळ्याने दिसतील. असो, असे उत्तर रोहित पवार यांनी राम शिंदेंना दिले आहे.

कर्जत-जामखेडच्या विकासाची पेरणी केली असून प्रयत्नांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेच्या साथीचं खत घालून कर्जत-जामखेडच्या मातीत विकासाचं पीक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पीक लवकरच बहरात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

वर्षभरातील कामांचा हा लेखा जोखा मांडत असताना विरोधकांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता कर्जत-जामखेडच्या विकासासाठी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे. कारण इथं कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरुय, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, राम शिंदे यांनी रोहित पवारांवर खोचक टीका केली होते. बारामती पॅटर्न राबवू,` याबाबत जनतेची घोर निराशा झाली असून, कर्जतमधील विकासाची घोडदौड थांबली आहे. वर्षभराचा लेखाजोखा पाहता कर्जत- जामखेडमधील विकासाचे नवे पर्व अपयशी ठरले आहे, अशी टीका राम शिंदे यांनी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post