सतत अशक्तपणा येतोय? मग गुळ-तूप खाण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बऱ्याच जणांना जेवतांना किंवा जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र, अनेकदा गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम, बर्फी वगैरे असे पदार्थ खाल्ले जातात. परंतु, आयुर्वेदानुसार, जेवणानंतर गोड पदार्थ खाणं चुकीचं आहे. या पदार्थांमुळे पचनक्रिया मंद होते. त्यामुळे जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाऊ नये असा सल्ला डॉक्टरदेखील देत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे ज्यांना जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते अशांसाठी गुळ-तूप हा सर्वोत्तम पर्याय आहे. गुळ आणि तूप खाण्याचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत. त्यामुळे हे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात..


१. गूळ-तूप खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

२. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.

३. केस व नखांसाठी फायदेशीर.

४. अशक्तपणा आल्यास दूर होतो.

५. हाडे मजबूत होतात.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post