अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मिरा-भाईंदर शहरातील अपक्ष आमदार गीता जैन यांनी शनिवारी ‘मातोश्री’ वर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवणुकीत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव करून गीता जैन या अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप पक्षालाच पाठींबा देत असल्याचे जाहीर केले होते. मात्र गेल्या एक वर्षांपासून भाजप पक्षातील स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी गीता जैन यांच्याकडे दुर्लक्षपणा केल्यामुळे नाराज गीता जैन यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. गीता जैन यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून मिरा भाईंदर १४५ आणि १४६ अश्या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे आमदार झाले आहेत.

गीता जैन यांची राजकीय कारकीर्द 
गीता जैन या २००२ रोजी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मात्र २००७ रोजी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढल्यावर त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २००९ रोजी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला व २०१२ रोजी भाजप पक्षातून निवडणुक लढवून नगरसेविका झाल्या. त्याच बरोबर २०१४ रोजी त्यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला. २०१७ रोजी पुन्हा भाजप पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. परंतु भाजप पक्षातून आमदारकीचे तिकीट न मिळाल्यामुळे २०१९ रोजी अपक्ष आमदार म्हणून निवडणुक लढवली आणि त्या विजयी झाल्या. यानंतर बरोबर एक वर्षानंतर त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post